माधवनगर रस्त्यावरील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय काही महिन्यांपूर्वी जुन्या बुधगाव रस्त्यावर स्थलांतरित झाले खरे मात्र या कार्यालयाच्या आवारात पावसामुळे दलदल निर्माण होऊन कार्यलयात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी हि बाब जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या निदर्शनास आणून दिली जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या जागेची पाहणी करून या कार्यालय आवारातील अंतर्गत रस्ते आणि सुशोभीकरण कामासाठी जिल्हा नियोजन समिती मधून सुमारे ६० लाखांचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे आता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हे कार्यालय कात टाकणार असून कार्यालय परिसर स्वच्छ आणि चांगल्या रस्त्यानी आणि वृक्ष संपदेने बहरलेला असेल अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली आहे त्याचप्रमाणे आता तातडीने वाहनांसाठी पार्किंग शेड ची उभारणी सुरु आहे गटारी आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे लवकरच हे कार्यालय नव्याने नागरिकांच्या सेवेत असेल असेही त्यांनी सांगितले
Discussion about this post