लोणार ता प्र :-सुनिल वर्मा
। दोन्ही भावांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन अज्ञात आरोपीने ३० हजार रुपये रोख व दागिणे असा ४५ हजार रुपयाच मुद्देमाल चोरून नेल्याची घटना तालुक्यातील वडगाव तेजन येथे काल सकाळी उधकीस आली. संतोष दत्तात्रय सिरसाट यांनी लोणार पोलिसात तक्रार दिली की, त्यांचा व त्यांचे भाऊ मोहन सिरसाट असे दोन्ही घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील ३० हजार रुपये रोख, ७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गहू मणी, ७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पॅनडल, १ हजार रुपये किंमतीचे चांदीचे लहानमुलाच्या हातातील कडे असा ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नापोकों गजानन दराडे यांच्याकडे देण्यात आला.

Discussion about this post