🙏
जयपालसिंह मुंडांचे विचारांपासून प्रेरणा घेऊन आदिवासी विकासाची नवी दिशा शोधण्याची गरज: -प्रा. अनिल होळी
मसेली, ता. कोरची | 3 जानेवारी 2025:
आज मौजा मसेली येथे 30 गाव इलाका समितीच्या वतीने आदिवासी समाजाचे नेते आणि संविधान सभेतील आदिवासी हक्कांचे रक्षक जयपाल सिंग मुंडा तसेच महिला शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रा. अनिल डी. होळी सर यांनी आपल्या मनोगतात जयपाल सिंग मुंडा यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, जयपाल सिंग मुंडा हे केवळ शिक्षण, क्रीडा आणि राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व नव्हते, तर संविधान सभेत आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी उभे राहून विशेष तरतुदींसाठी लढा देणारे नेते होते. त्यांच्या विचारांनी आदिवासी समाजाच्या शिक्षण, राजकीय सहभाग आणि ग्रामविकासाला नवी दिशा दिली.
प्रा. होळी सर म्हणाले की, आजच्या पिढीने जयपाल सिंग मुंडा यांच्यापासून प्रेरणा घेऊन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले पाहिजे. कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानावरही चर्चा झाली.
कार्यक्रमाला मा.रामसुरामजी काटेंगे, मा. अनिलजी केरामि, मा. सुनीलजी सयाम, मा. बाबुरावजी मडावी, मा. सुखदेवजी टेकाम, मा. वरखडे सर (मुख्याध्यापक), मा. राजारामजी नैताम, सौ. विद्याताई हिडामी, तसेच मसेली ग्रामस्थ, आश्रम शाळा मसेलीचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान आदिवासी हक्कांच्या संरक्षणासाठी जयपाल सिंग मुंडा यांच्या कार्याला उजाळा देत, समाजातील युवकांनी त्यांचे विचार आत्मसात करून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहावे, असा संदेश देण्यात आला.
✍🏻प्रतिनिधी: प्रविण डी कोवाची
9637165828
🔖Tag: pravin D kowach
Discussion about this post