तुमसर:-तालुक्यातील गोबरवाही पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मौजा चिखला माईन्स परिसरात चार वर्षीय निल मनोज चौधरी याच्या अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 1 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली असून, अपहृत मुलाचा शोध अद्याप लागलेला नाही.फिर्यादी अतीश बुध्दीमान दहीवले (वय 26, रा. बावन कॉलोनी, चिखला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निल चौधरी हा त्या दिवशी अचानक दिसेनासा झाला. गावात तसेच परिसरातील जंगलात शोध घेऊनही मुलगा सापडला नाही. फिर्यादीच्या मते, कोणीतरी काहीतरी आमिष दाखवून त्याला फुस लावून पळवून नेले असावे.
या घटनेची नोंद गोबरवाही पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 137(2) अन्वये करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक गिरी यांच्या आदेशानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास पोउपनि गिते करित असून सदर प्रकरण गंभीर असल्याने पोलीस विभागाने सर्वतोपरी शोधमोहीम सुरू केली आहे.स्थानिक नागरिकांनी अपहृत मुलाबाबत काही माहिती आढळल्यास गोबरवाही पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post