पोलीस स्टेशन आर्णी… ता आर्णी जि यवतमाळ.. प्रतिनिधी मुरली राठोड मो 9307493402 आर्णी पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक 02/01/2025 ते दिनांक 08/01/2025 पर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत असून त्याच्याच भाग म्हणून आज दिनांक 03/01/2025 रोजी पोलीस स्टेशन आर्णी चे ठाणेदार श्री केशव ठाकरे यांनी शहीद भगतसिंग विद्यालय आर्णी येथे विद्यार्थी सोबत कार्यशाळा घेतली त्यामध्ये वर्ग 05 ते 10 वि च्या विद्यार्थी / विद्यार्थिनी यांना सायबर काईम लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 मधील बालकाचा सुरक्षेबाबत तरतुदी महिला सबंधने गुन्हे महिला दक्षता समिती महिला समुपदेशन कक्ष भरोसा सेल पोलीस मित्र तसेच अल्पवयीन मुला मुलीचे पळून जाण्याचे त्याचे शैक्षणिक व सामाजिक जीवनमनावर होणार परिणाम तसेंच मोटार वाहन कायदा या संदभाने कायदेशीर मार्गदर्शन करून रस्ता सुरक्षा व वाहतुकीचे तसेच वाहतुकीचे सूचना चिन्हाबाबत ओळख करून देण्यात आली त्यानंतर पोलीस स्टेशन आर्णी येथे नगर परिषद कन्या शाळा आर्णी येथील विद्यार्थिना बोलावून त्यांना पोलीस स्टेशन मध्ये चालणारे दैनदिन कामकाज वायरलेस विभाग सिसीटी एनएस प्रणाली हेड मोहरर कक्ष गोपनिय कामकाज तसेच गुन्हे अभिलेख कक्षाचे कामकाज संबंधाने माहिती देवून महिला व पुरुष कोठडी दाखवून माहिती देण्यात आली.
तसेच पोलीस स्टेशन येथे असलेल्या विविध विविध अग्निशस्त्राची ओळख करून देण्यात आली. या सर्व कार्यक्रम मध्ये शहीद भगतसिंग विद्यालय चे मुख्याध्यापक श्री मुकुंद गायके पंकज काटकर संतोष गोदलावर दयासागर मुदगुलवार नरेंद्र काकडे वनिता कासार मोनिका गोदलावर हे शिक्षणगण हजर होते तसेच नगरपरिषद कन्या शाळा आर्णी चे मुख्याध्यापक श्री प्रमोद निला वार मजुशा निर्मलवार यांनी सहकार्य केले पोलीस स्टेशन आर्णी चे ठाणेदार श्री केशव ठाकरे साहेब तसेच सर्व पोलीस अधिकारी/ अमलदारानी यामध्ये सहभाग नोंदविला आहे.
Discussion about this post