वडवणी|प्रतिनिधी
वडवणी शहरातील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दि.३ जानेवारी २०२५ गुरुवार रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य राऊत डी.डी.तर प्रमुख अतिथी व वक्त्या म्हणून मराठी साहित्य विभागाच्या प्रमुख श्रीमती शोभाताई आंधळे मॅडम तशाच हिंदी विषयाच्या अध्यापिका श्रीमती फलके मॅडम,उपप्राचार्य मस्के सर,पर्यवेक्षक धाईतिडक सर मान्यवर म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार,गुलाल,फुले वाहून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व मान्यवर व उपस्थिंताचे विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले.
कु.ईश्वरी भालेराव,कु.राधिका निरडे तसाच सावित्रीबाई वेश्यामध्ये कु.कविता मुंडे,कु.पूनम आडे या विद्यार्थिनींनी आपले विचार व्यक्त केले व कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती शोभाताई आंधळे मॅडम यांनी जयंती निमित्त सुखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करून जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि श्रीमती फलके मॅडम यांनी जयंतीच्या अनुषंगाने विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे उपप्राचार्य मस्के सर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.अंडील सर यांनी केले व उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक धाईतिडक सर यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post