दि. ३-१-२०२५ रोज शुक्रवारला सरस्वती माध्यमिक विद्यालय मुकुटबन येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती वकृत्व स्पर्धा घेऊन साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका सौ ममता जोगी मॅडम तर प्रमुख पाहुणे श्री जिट्टावार व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सलोनी पांडुरंग झाडे , दुसरा क्रमांक नकुल विजय लोहे तर तिसरा क्रमांक ईश्वरी अरविंद सरोदे या विद्यार्थ्यांचा आला.
अध्यक्ष भाषणात जोगी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण व सामाजिक कार्य काय असते तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख करून दिली.
वाचन हे किती जीवनात महत्त्वाचा असते हे त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गा लोनगडे यांनी केले व आभार प्रदर्शन राणी बरडे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post