📍
नांदेड : देगलूर आणि बिलोली या दोन्ही तालुक्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा खा. अजित गोपछडे हे दिनांक ४ जानेवारी रोजी घेणार आहेत दोन्ही ठिकाणी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली देशभरात सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास करण्याच्या अनुषंगाने असंख्य योजना राबविल्या जात आहे. मात्र या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत का नाही , विकास कामाची प्रगती कशी आहे अनुषंगाने खा. अजित गोपछडे आढावा घेणार आहेत .
उद्या “दिनांक चार जानेवारी २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता देगलुर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले” असून या बैठकीला सर्वच विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर “दुपारी चार वाजता बिलोली येथे तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.” या दोन्ही बैठकीत राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा आढावा घेतला जाणार आहे . अशी माहिती खा. अजित गोपछडे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
Discussion about this post