प्रतिनिधी:- अंकित घाडीगावकर
तळेरे येथील फ्लेक्स फिटनेस व्यायामशाळा आयोजित जिल्हास्तरीय सिंधु श्री शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली.जिल्ह्यातील ८० स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूण तडफदार युवा नेतृत्व मत्स्य उद्योग व बंदर विकस मंत्री मा. श्री.नितेशजी राणे यांच्या हस्ते झाले. सोबत फ्लेक्स फिटनेसचे संचालक अभिमन्यू पाताडे, श्री.संजय पाताडे, माजी सभापती श्री. मनोज रावराणे, भाजपा कणकवली मंडळ अध्यक्ष श्री दिलीप तळेकर, माजी जि. प. सदस्य.श्री बाळा जठार, माजी जि. प.सदस्य श्री. संजय देसाई, तळेरे माजी सरपंच श्री. शशांक तळेकर, कासार्डे सरपंच सौ. निशा नकाशे इ. मान्यवर उपस्थित होते.
सर्वच सहभागी स्पर्धकांनी आपण केलेल्या मेहनतीचा कस लावत अंग प्रदर्शन केले. पण कुठल्याही स्पर्धेमध्ये विजेता एकच ठरतो. त्याच प्रमाणे बी. एफ. सी व्यायामशाळा बांदा येथील संदेश सावंत याने उत्तम प्रदर्शन करत परीक्षक व प्रेक्षकांची मने जिंकून “सिंधु श्री” पुरस्काराचा मानकरी ठरला. तर तळेरे येथील पोलीस खात्यात सेवा देते असणारा सुपुत्र श्री. योगेश वायगंकर उपविजेते पद पटकावले.
Discussion about this post