विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांची राहणार रेलचेल
वडवणी :- ( प्रतिनिधी )
वडवणी शहरामध्ये शाकंभरी पौष पौर्णिमेनिमित्त श्री.श्री. श्री. दयानंद पुरी महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने ह.भ.प.नवनाथ महाराज चिनके यांच्या प्रेरणेतून व ह.भ.प.प्रेममूर्ती नामदेव महाराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी शहरात प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि भव्य कीर्तन महोत्सव तथा अखंड हरिनाम सप्ताह याचे आयोजन करण्यात आले असून बाचा आरंभ सोमवार दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी होणार असून याची सांगता शाकंभरी पौष पौर्णिमा दिनी सोमवार दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. यादरम्यान विविध धार्मिक, अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांची मोठी रेलचेल राहणार असून तरी या अध्यात्मिक पर्वणीचा पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ वडवणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम पाठ, ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन व नंतर हरिजागर होईल. या सर्व अध्यात्मिक सोहळ्यासाठी मुख्य मार्गदर्शक असलेले ह.भ.प. प्रेममूर्ती नामदेव महाराज लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा संपन्न होणार असून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यासाठी ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह.भ.प. भागवत महाराज शिंदे हे करणार आहेत.
व त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत प्रेममूर्ती ह.भ.प. नामदेव महाराज लबडे पंढरपूर यांचे काल्याचे किर्तन होईल आणि त्यानंतर लागलीच सार्वजनिक महाप्रसादाची महापंगत संपन्न होईल. तरी अशाप्रकारे वडवणी शहरातील या भव्य अशा अध्यात्मिक पर्वणीचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ वडवणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.या सप्ताहामध्ये व किर्तन महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहेत. या उत्सवासाठी गेल्या महिनाभरापासून जय्यत तयारी करण्यात येत आहे. हा महोत्सव दि. ६ ते १३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
या सप्ताहाच्या निमित्ताने दैनिक कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ७ विष्णूसहस्त्रनामपाठ, ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० हरि कीर्तन व नंतर हरिजागर होईल. दि.१३ रोजी सकाळी ८ ते १० चौंडेश्वरी मातेची भव्य मिरवणूक निघेल. या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह.भ.प. भागवत महाराज शिंदे याचे आहे तर गाथा भजन व काकडा नेतृत्व आणि साथ ह. भ. प. दामू अण्णा गोंडे व समस्त भजनी मंडळी व हरिपाठ नेतृत्व व साथ ह.भ. प. सखाराम म. बानेगावकर यांचे आहे. तर मृदंगाचार्य सर्वश्री ह भ प तालमणी वैभव म सावळे, कैवल्य नामदेव लबडे, ज्ञानेश्वर म. लोकरे, रंगनाथ म. देवकते तर गायनाचार्य ह.भ.प. अनिरुद्ध म. नालेगावकर, ह भ प माऊली म घुमरे, ह भ माऊली म धारासुरकर, भ प बप्पा म कोठुळे, ह भ प माऊली म कुटे, आसाराम म. आंबुरे, महादेव म. जाधव, सखाराम म. बानेगावकर, विष्णू म कोठुळे , पुरुषोत्तम म. कोठुळे, विष्णुपंत निपटे, तात्यासाहेब म. मस्के, हरिभाऊ म. जाधव, गोपीनाथ मस्के हे असतील.
हा सप्ताह श्री श्री श्री दयानंद पुरी महास्वामीजी व ह.भ.प. नवनाथ महाराज चिनके यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने होत आहे. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दु.४ ते ५ प्रवचन होणार आहे. दि.६ रोजी ह.भ.प.सुधाकर म. चिनके, दि.७ रोजी ह. भ. प. दता म. पूनंदगावकर, दि.८ रोजी ह. भ. प. विठ्ठल म.शास्त्री, दि.९ रोजी ह. भ. प. बजरंग म. धायरे, दि.१० रोजी ह.भ. प.राजाराम म. सूर्यवंशी, दि.११ रोजी ह. भ. प. चंद्रकांत म. सातोनेकर, दि.१२ रोजी ह. भ. प. भागवत म.शिंदे यांचे प्रवचन आहे.
दि.६ रोजी ह.भ. प. केशव म. उखळीकर, दि.७ रोजी ह. भ. प. शिवाजी म. बावस्कार, दि. ८ रोजी ज्ञानसिंधू ह. भ. प. संदिपान म. शिंदे, दि. ९ रोजी ह.भ. प. सागर म. बोराटे, दि.१० रोजी ह.भ.प. रामकृष्ण म. लोहगावकर, दि. ११ रोजी ह. भ. प. योगिराज म. गोसावी, दि. १२ रोजी ह.भ. प. अनिल म. पाटील यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे तर सोमवार दि.१३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत प्रेममूर्ती ह.भ.प. नामदेव महाराज लबडे यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर सार्वजनिक महाप्रसादाची पंगत होणारा आहे. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्व भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ वडवणी च्या वतीने करण्यात येत आहे.
Discussion about this post