शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे: येथील जि.प.कनिष्ठ प्राथमिक शाळेत शुक्रवार (दि.3) जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात संपन्न झाला.
सर्वप्रथम क्रांतीज्योतीच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका दिपेश्वरी झोळे यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आपल्या भाषणातून छान माहिती सांगितली.शाळेतील मुलींनी सावित्रीची वेशभूषा करून गित आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक प्रकाश कापगते यांनी सावित्रीबाई विषयी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्य माता पालक उपस्थित होत्या. त्यात प्रामुख्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रिता गजभिये, उपाध्यक्ष जयश्री ईरले, दुर्गा गेडाम, नमिता कोडापे, दुर्गा कालेकर यांची उपस्थिती होती.सहाय्यक शिक्षक बेनिराम ब्राम्हणकर यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले.
Discussion about this post