प्रतिनिधी:- गणेश वाडेकर
रामप्रसाद घासीप्रसाद अहेरवार वय ४२ वर्षे व्यवसाय मजुरी राहणार मोचीपुरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हे शुक्रवार ३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घरी असताना फिर्यादीचा काका शिवा उर्फ | शिवचरण भैया अहेरवार व मावसभाऊ सोनू उर्फ मनोज शिवचरण अहवाल हे दारूच्या नशेत घरी आले व फिर्यादीला आमचे घर खाली कर या क्षुल्लक कारणावरून काठीने मारहाण केली फिर्यादीची बहीण मध्यस्थी करण्याकरिता आली असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.