
देवळा प्रतिनिधी – भारत पवार
ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते. शिक्षणापासुन आणि स्वातंत्र्य पासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी ठेवले जात होते. त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला. पुढे मात्र सवित्रीबाईंना, जोतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोन असल्याने, स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले….ज्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत, बालविवाहावर बंदी आहे, विधवांवरील अत्याचाराला लगाम आहे. आणि महिलांचे कल्याण आहे.सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले आणि समाजातील कुप्रथा समूळ उखडून टाकल्या…
सावित्रीबाई फुले भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री, भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका. त्यांच्या थोर सामाजिक कार्य विषयाची कृतज्ञता म्हणून 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय प्राचार्य डॉ.हितेंद्र आहेर (बापूसाहेब) व सचिव आदरणीय प्रोफेसर डॉ. मालतीताई आहेर मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी उपप्राचार्य डॉ.जयवंत भदाणे सर,मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पगार मॅडम,पर्यवेक्षक श्री.कौतिक खोंडे सर,सर्व प्राध्यापक,शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थीनी यांच्या वतीने ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले..
Discussion about this post