आळते ता.हातकणंगले, येथील रेणुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्री शिवतेज शिशु विकास मंदिर, का आळते यांचा सालाबादप्रमाणे याहीवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुणदर्शन सोहळा (२०२४-२५), १ व २ जानेवारी असे सलग दोन दिवसीय या कार्यक्रमात अनेक मान्यवर व प्रमुख पाहुण्याच्या उपस्तिथीत पार पडला.
लहान गट, मोठा गट व पहिलीच्या सर्व मुलामुलींच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष मा. सरपंच मुरलीधर उर्फ संजय दीक्षित व शिवतेज पतसंस्थेचे डॉ . सुरज बुरसे यांनी १ जानेवारी २०२५ रोजी आपल्या संचालक मंडळ व शिक्षकेत्तर, कर्मचारी यांच्या सहयोगाने वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ (२०२४-२५) हा वेगळा ठेवण्यात आला होता. जेणेकरून लहान मुलामुलींना आपली सुंदर कला आपल्या पालकांना व उपस्थीत प्रेक्षकांना दाखवता आली. ज्यामुळे पालक व प्रेक्षक भारावून गेले. सदरच्या या वेगळ्या ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे पालकांनी या निर्णयाचे भरभरून कौतुक व स्वागत संस्थेचे अध्यक्ष संजय दीक्षित , सर्व संचालक मंडळ व शिक्षकेत्तर, कर्मचारी यांचे केले. सदरच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे आळते गावचे सुपुत्र व उद्योगपती मा. श्री रावसाहेब हावळे हे होते.
दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम हा २ डिसेंबर २०२५ रोजी दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आला होता. या मध्ये पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुणदर्शन सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते दिगंबर नाईक आणि उमेश बोळके हे होते. त्यांनी आपल्या खास कोकणी भाषेमध्ये विनोदी शैलीत प्रेक्षकांना आणि पालकांना खूप हसवले.
या कार्यक्रमासाठी तारदाळचे सुपुत्र गुरुकुमार पाटील व आळतेचे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुलकर्णी व सुकुमार अब्दागिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी सर्वश्री इमाम मुल्ला, माणिक संकान्ना, बाळगोंडा पाटील, सतीश देवकाते , सुनील पाटील , सुदर्शन संकान्ना , विजय कांबळे, नितीन पाटील , मनोज कुंभार , सचिन सुतार , बाळासो हावळे , लालासो पोवार , आशिष भबान, संजय कुलकर्णी, भीमराव सुतार, विजय हुकीरे, शेखर जोशी, काशिनाथ बोते ( मामा), प्रवीण दीक्षित , राहुल कदम, कमरुद्दीन मुजावर( चाचा) यांची उपस्थिती होती.

हा कार्यक्रम संपन्न करणेसाठी संस्थेचे मुख्याध्यपिका, सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग, शिवतेज परिवार, शिवतेज पतसंस्था, पवन मंडप व श्रावणी केटरर्स यांचे सहकार्य लाभले.
Discussion about this post