नारायणगाव : तमाम हिंदू धर्माचे आराध्य दैवत, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे १९ फेब्रुवारी जयंतीचे विवो आणि ओपो मोबाईल कंपनीचे कॅलेंडर ॲप मध्ये ‘शिवाजी जयंती’ असा एकेरी उल्लेख केलेला आहे. एकेरी असलेल्या नावाचा उल्लेख काढून ‘राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती’असा उल्लेख दोन दिवसात करावा, अन्यथा नारायणगाव आणि परिसरातील या कंपन्यांचे स्टोअर्स उघडून देणार नाही, असा इशारा राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, नारायणगावचे उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांनी दिला आहे.शिवजन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी (जुन्नर) येथे १९ फेब्रुवारी इ. स. १६३० रोजी झाला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कदापि खपवून घेणार नाही. पुढील दोन दिवसात कॅलेंडर ॲप मध्ये ‘राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती’ असा उल्लेख झाला नाही तर नारायणगाव आणि परिसरातील या कंपन्यांचे स्टोअर्स उघडू देणार नाही, असे पत्र व वरिष्ठ कार्यालयासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली, अशी माहिती योगेश उर्फ बाबू पाटे यांनी दिली.
Discussion about this post