दि. ५ जानेवारी (प्रतिनिधी : हणमंत पांचाळ), येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात सुरू झालेल्या माळेगाव येथील कुस्तीच्या दंगलीतील मानाची पहिली कुस्ती माळाकोळी ता. लोहा येथील दीप रविदास कागणे या पहेलवानाने जिंकली असून त्यांनी राम तेलंगे पालम येथील राम तेलंगेची पाठ टेकवली.
माळेगाव यात्रेत वीर नागोजी नाईक मैदानात झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन..!
नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, मा. आमदार रोहिदासरावजी चव्हाण,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, श्याम दरक, एकनाथ मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे, माजी शिक्षण सभापती संजय क-हाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोसीकर, हनुमंत धुळगंडे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, समाज कल्याण अधिकारी आऊलवार, गणेशराव साळवे, डॉ. प्रमोद चिखलीकर, श्रीधर चव्हाण, बंटी पाटील उमरेकर, रोहित पाटील, अनिल बोरगावकर, नरेंद्र गायकवाड, माधव चांदने, केरबा पाटील मन्नान चौधरी, श्रीनिवास मोरे, ग्रामविकास अधिकारी देवकांबळे, आपला नांदेड जिल्हा सोशल मिडीयाचे, अँकर हणमंत पांचाळ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे, मोहन पा. पवार, विशाल घंटे, शरद चव्हाण, सुनील चव्हाण, संग्राम चव्हाण, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
माळेगाव येथील आखाड्यावर झालेल्या कुस्ती दंगलीमध्ये नांदेड जिल्ह्यासह लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोलीसह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील पहिलवानांनी हाजरी लावली. लाखो यात्रेकरूंच्या साक्षीने हलगीच्या तालावर अनेक पैलवानांनी आपापल्या डावपेचाद्वारे प्रतिस्पर्धी पैलवानांना चांगलीच पकड दिली.
माळेगाव येथील ग्रामपंचायतच्या कार्यालयातून मान्यवरांच्या उपस्थितीत निशान घेऊन श्री खंडोबाचे दर्शन घेतले. यानंतर खंडोबाच्या साक्षीने कुस्तीच्या आखाड्याकडे प्रस्थान करून मान्यवर व यात्रेकरू यांच्या उपस्थितीत कुस्तीची दंगल पार पडली. यावेळी विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे, सतिश चोरमले यांच्यासह लोहा पंचायत समितीचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम कौशल्य यांनी केले.
माळेगाव यात्रेला (अ) दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- खा. रवींद्र चव्हाण
माळेगाव देवस्थानाला (अ) दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले. याशिवाय, गावकऱ्यांच्या स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मारक उभारणीच्या मागणीला देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच माळेगाव येथे होत असलेल्या कुस्त्या अतिशय काटेकोर पणे नियमांत पार पाडल्या जावेत. कुस्तीच्या कार्यक्रमासह माळेगाव येथील सर्वच कार्यक्रम उत्कृष्टपणे व नियोजनबध्द झाल्याबद्दल सर्वाचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी श्री खंडोबाचे दर्शन घेऊन सर्व शेतकरी व कामगार यांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली.
Discussion about this post