अक्कलकोट (तालुका प्रतिनिधी)दि-रिपब्लिकन पक्ष(आठवले गट)चे पुणे शहर उपाध्यक्षपदी राम शांतमल सोनकांबळे यांच्या नुकत्याच निवड झाल्याने अक्कलकोट तालुका रिपाइं च्या वतिने फेटा बांधून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आली आहे.
राम सोनकांबळे हे उद्योगपती कालकथीत शांतमल सोनकांबळे यांच्या चिरंजीव असून ते मूळचे अक्कलकोट तालुक्यातील चिंचोळी(मैं)चे सुपुत्र असून पुण्यात युवा उद्योजक म्हणून प्रसिध्द आहे.काल ते एका खाजगी कार्यक्रमासाठी चिंचोळी(मैं)या गावी आले असता त्यांच्या फार्महाऊस येथे अक्कलकोट रिपाइं तर्फे गौरविण्यात आली. या प्रसंगी मा.सरपंच कल्यणी सोनकांबळे,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,युवक आघाडी जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरु,तालुका सरचिटणीस राजु भगळे,दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,भोसगेचे शाखाध्यक्ष मलकण्णा सोनकांबळे,आंदेवाडीचे सरपंच रमेश धोडमनी,पत्रकार निंगप्पा निंबाळ,प्रदीप सुळे,दीपक सोनकांबळे,देवेंद्र नागरी सह इतर उपस्थित होते.
Discussion about this post