5/01/2025
अकोला:
जुने भांडणाचे कारणावरून विटेने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी एका विरूध्द गुन्हा नोंदविला आहे. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार जुने भांडणाचे कारणावरून अब्दुल मुतलीब अब्दुल रऊफ (३२) रा. सैय्यदपुरा बाळापूर यास मोहम्मद रिझवान झारेकर याने जुने भांडणाचे कारणावरून विटेने मारून जखमी केले. सदर प्ररकणी अब्दुल मुतलीब अब्दुल रऊफ याने दिलेल्या फिर्यादनुसार बाळापूर पोलिसांनी कलम ११८ (१) ३५२ बीएनएस अन्वये मोहमंद रिझवान झारेकर याचेविरूध्द गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Discussion about this post