तुमसर: महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या नियम २२ एन (२) अंतर्गत भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने ठाणेदारांच्या बदल्यांचे आदेश ४ जानेवारी २०२५ रोजी जारी करण्यात आले आहेत.
त्यानुसार, तुमसर पोलीस ठाण्याचे ठाणेदार महादेव आचरेकर यांची बदली साकोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, त्यांच्या जागी संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गोबरवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद गिरी यांची बदली दोषसिद्धी सेल, अतिरिक्त कार्य. मानव संसाधन विभागात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शरद शेवाळे यांची गोबरवाही पोलीस ठाण्याचे ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सिहोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन मदनकर यांची बदली भंडारा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, त्यांच्या जागी विजय कसोधन यांची ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी या बदल्यांचे आदेश काढले आहेत. प्रशासनिक कारणांमुळे व कार्यक्षमता वाढविण्यासाठी या बदल्या करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तुमसर तालुक्यातील या बदल्यांमुळे पोलीस प्रशासन अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Discussion about this post