शिराढोण :-शिराढोण जिल्हा परिषद शाळेच्या वतीने दर्पणकार तथा मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करून पत्रकारांचा सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिराढोण चे सरपंच तथा प्राचार्य खुशाल पाटील पांडागळे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिराढोण चे मालिपाटील व्यंकटराव पाटील पांडागळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर पाटील कपाळे, उपाध्यक्ष शिवहार भुरे हे होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात पांडागळे पुढे बोलतांना म्हणाले कि,शिराढोण उस्मान नगर सह परिसरातील सर्वच पत्रकारांनी आतापर्यंत गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, परिसरात समाजा समाजात तेढ निर्माण होईल अथवा कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे वागले नाही याचा मला सार्थ अभिमान आहे असे ते म्हणाले. यावेळी शिराढोण -उस्माननगर पत्रकार संघांचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाबाराव विश्वकर्मा यांनी केले तर आभार राठोड सर यांनी मानले.
Discussion about this post