
पिंपरी : त्यामुळे आरोग्य विभागाने आठ क्षेत्रीय कार्यालयांतील ८० ठिकाणांची पाहणी करून तेथे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील घंटागाड्यांची वेळ बदलण्यात येणार असून, या ८० ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून देशभर स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारचे एक पथक शहरातील झोपडपट्टी, मंडई, बाजारपेठ, लोकवस्ती, सार्वजनिक शौचालये, रस्ता आदी भागांची पाहणी करून दर वर्षी स्वच्छतेचे क्रमांक जाहीर करते. स्वच्छ सर्वेक्षणासाठी दर वर्षी केंद्राचे पथक फेब्रुवारी महिन्यात येते. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने स्वच्छतेसाठी आतापासून पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे..
Discussion about this post