प्रतिनिधी:अमोल कोलते
प्रहार दिव्यांग क्रांतीचे संस्थापक तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष श्री शिवाजी गाडे यांची प्रहार दिव्यांग क्रांती महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे..
गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी मुंबई येथे दिव्यांग मंत्रालय विभाग कार्यालयात माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलविण्यात आली होती..
यावेळी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री धर्मेंद्र सातव राज्य संपर्कप्रमुख श्री रामदास खोत व कोकण विभाग प्रमुख श्री सुरेश मोकल यांच्या हस्ते श्री शिवाजी गाडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले..
यावेळी नाशिकचे चंद्रभान गांगुर्डे, ठाणे येथील काजल नाईक सह राज्यातील इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post