उदगीर/ कमलाकर मुळे : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ,मुंबई व रंगकर्मी साहित्य,कला,क्रीडा प्रतिष्ठान उदगीर च्या वतीने ८ फेब्रुवारी २०२५ रोजी होऊ घातलेल्या लोकसंस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी परभणी येथील नामवंत साहित्यतिक कवी इंद्रजित भालेराव तर उदघाटक म्हणून माजी मंञी आ.संजय बनसोडे स्वागताध्यक्षपदी बस्वराज पाटील नागराळकर यांची निवड करण्यात आली असून सिनेअभिनेते मिलिंद कांबळे यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती संयोजक समितीचे कार्यवाह,मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके,रंगकर्मी प्रतिष्ठानचे बिभीषण मद्देवाड यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे दिली आहे.
एक दिवसीय लोकसंस्कृती साहित्य संमेलन शहरातील शिवाजी महाविद्यालय परिसरात पार पडणार आहे.शनिवारी सकाळी ८.३०वाजता छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ग्रंथ दिंडीने संमेलनाची सुरूवात होणार असून १०.३० वाजता माजी मंञी आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.संमेलनाध्यक्ष म्हणून नामवंत साहित्यतिक इंद्रजित भालेराव तर सिनेअभिनेते लेखक दिग्दर्शक मिलींद शिंदे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर राहणार आहेत.या संमेलनात परिसंवाद,कथाकथन,कविसंमेलन,राज्यस्तरीय पञकारिता व साहित्य पुरस्कार वितरण आणि समारोप असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. सायंकाळी उदगीरच्या मातीतील लोकसंस्कृती हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.साहित्य प्रेमी नागरिकांनी संमेलनात सहभागी व्हावे. असे आवाहन कार्यवाह रामचंद्र तिरूके,रंगकर्मीचे बिभीषण मद्देवाड,ज्योतीताई मद्देवाड,सहकार्यवाह सिध्दार्थ सुर्यवंशी,रसूल पठाण,प्रा.रामदास केदार,लक्ष्मण बेंबडे,महेश मळगे,मारोती भोसले,विवेक होळसंबरे,निता मोरे यांनी केले आहे.
Discussion about this post