गडचिरोली: जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आमदार रामदास मसराम यांनी भेट देऊन रुग्णांची पाहणी केली. आरोग्य सेवांच्या दर्जात सुधारणा करण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध उपाययोजनांवर भर दिला. कोरची, कुरखेडा, आरमोरी आणि वडसा या ठिकाणी ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, जेणेकरून गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळू शकतील.

तशेच अपंग प्रमाणपत्रांसाठी योग्य असेसमेंट प्रक्रिया राबविण्यावरही भर दिला, ज्यामुळे अपंग व्यक्तींना वेळेत प्रमाणपत्रे मिळतील. तसेच, रक्तपेढीच्या सुविधांबाबत त्यांनी ब्लड स्टोरेज कुरखेडा आणि वडसा येथे सुरू करण्याची गरज व्यक्त केली.

•आरोग्याशी संबंधित इतर समस्यांवर आमदारांनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा केली आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आमदार मसराम यांच्या या भेटीमुळे स्थानिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

✍🏻प्रतिनिधी: प्रविण डी कोवाची
(9637165828)
🔖Tag: pravin D kowachi
Discussion about this post