प्रतिनिधी निलेश सुर्वे हिंगोली . . हिंगोली जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी होऊन अनेक पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यामध्ये सोयाबीन, कापूस,व इतर पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांनी पिक विमा मोठ्या प्रमाणात भरला होता. जिल्हाधिकारी यांनी या संबंधित आदेश देखील विमा कंपनीला दिला होता.
परंतु जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली विमा कंपनीने केली असून आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पिक विमा जमा झालेला नाही. यामुळे हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटना यांच्यावतीने जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. लवकरात लवकर पिक विमा मिळाला नाही तर यापेक्षाही आक्रमक भूमिका घेण्यात येईल असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी दिलेल्या निवेदनावर गजानन कावरखे, नामदेव पतंगे, यांच्यासह दहा ते बारा शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
Discussion about this post