प्रतिनिधी अनिल बघे
अमरावती : चाकूच्याधाकावर तरुणाजवळील दुचाकी व मोबाइल हिसकाविणाऱ्या लुटारूला फ्रेजरपुरा पोलिसांनी ८ जानेवारी रोजी अटक करून त्याच्याकडून ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.कृष्णा प्रमोद सूर्यवंशी (१९, रा. महेंद्र कॉलनी) असे अटक करण्यात आलेल्या लुटारूचे नाव आहे. कपिलवस्तुनगर येथील रहिवासी प्रदीप उर्फ मयूरेश नत्थूजी खंडारे (३५) हा ३ जानेवारी रोजी दुपारी परिचयातील कृष्णा सूर्यवंशी याला भेटायला गेला होता, त्यावेळी प्रदीपला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील दुचाकी व मोबाइल हिसकाविला.
पोलिसात तक्रार केल्यास जिवाने मारण्याची धमकी कृष्णाने प्रदीपला दिली.याप्रकरणी प्रदीपने ८ जानेवारी रोजी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी कृष्णाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.गुन्हा दाखल झाल्यावर काही तासांतच पोलिसांनी कृष्णाचा शोध घेऊन अटक केली. त्याच्याकडून दुचाकी, मोबाइल व चाकू असा ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कृष्णा हा रिकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्धजिवे मारण्याचा प्रयत्न, वाहनांची
जाळपोळ, घातक शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई फ्रेजरपुराचे ठाणेदार नीलेश करे, पोलीस निरीक्षक नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन, सुभाष पाटील, शशिकांत गवई, सचिन बोरकर, सागर चव्हाण, जावेद पटेल यांनी केली.
Discussion about this post