बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी अनिल बघे
शेवटून पहिला क्रमांकावर गणल्या जायचा. काळानुरूप गुन्हेगार आणि त्यांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीचे अनुकरण बुलढाण्यातही होऊ लागले आहे. कुठे परजिल्ह्यातील गुन्हेगार मातृतीर्थात येऊन आपल्या गुन्हेगारी कारवायांना अंजाम देत आहेत. असेच काही ‘पुणे’री गुन्हेगार बनावट भारतीय चलनी नोटा घेऊन बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झाले. मात्र ‘एलसीबी’च्या साहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कनसे नावाच्या वाघिणीने, धाड ठाणेदार आशिष चेचेरे व सहकाऱ्यांच्या सोबतीने आरोपींना गुन्हा करण्यापूर्वीच जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून आठ लाख ८३ हजारांच्या ५०० व २०० रुपये किमतीच्या बनावट भारतीय चलनी नोटांसह तब्बल १६ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या कुशल मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या दमदार नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.काही महिन्यांपासून जिल्ह्यातील गुन्हेगारी स्वरूप झपाट्याने बदलताना दिसत आहे. परजिल्ह्यातील गुन्हेगारांना येथील वातावरण पोषक ठरत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या गुन्हेगारी जगतात हळूहळू बुलढाणा जिल्हाही आपला गुन्हेगारी ठसा उमटविताना दिसत आहे. दुसरीकडे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनता ‘टीम बुलढाणा पोलीस ‘ही मरगळीची कात टाकताना दिसत आहेत. पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यासह गुन्हा घडण्यापूर्वीच त्याला प्रतिबंध करण्याचा जणूकाही धडाकाच लावला आहे. आपल्या धडाकेबाज कारवायांची गुन्हेगारांवर छाप पाडणाऱ्या,आरोपींकडून १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगतमात्र प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कनसे यांनी नेहमीप्रमाणे एक मोठा गुन्हा घडण्यापूर्वी त्याला प्रतिबंध घातल्याने बुलढाणा पोलीसदलाची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे.’पुणे’री टोळीतील काही गुन्हेगार बनावट भारतीय चलनी नोटा घेऊन धाडमार्गे बुलढाणा तालुक्यात येत असल्याची माहिती स्थागुशाच्या सपोनि. यशोदा कनसे यांना मिळाली. त्या आधारे कनसे यांनी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात व स्थागुशाचे पोनि. अशोक लांडे यांच्या नेतृत्वात धाड ठाणेदार आशिष चेचेरे, पोलीस अंमलदार राजेश टेकाळे, अनुप मेहर, विजयNagpur Editionवारुळे, विजय पैठणे, मंगेश सनगाळे, मनोज खारडे, दीपक वायाळ, ऋषिकेश थुटे, चालक पोलीस अंमलदार समाधान टेकाळे, तांत्रिक विश्लेषक राजू आडवे, ऋषिकेश खंडेराव, पोलीस अंमलदार रवींद्र वहऱ्हाटे, राजू माळी, श्रीकृष्ण चव्हाण, ईश्वर हावरे, नितीन माळोदे यांना सोबत घेऊन ८ जानेवारीच्या रात्री धाड पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या म्हसला खुर्द शिवारातील हॉटेल गीतांजली फॅमिली गार्डन अॅण्ड रेस्टॉरंटसमोर नाकाबंदी केली. समोरून येणारे एमएच १२/ व्हीव्ही ०१३० क्रमांकाचे इटिंगा वाहन थांबविले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये पृष्ठाच्या वॉक्समध्ये ५०० रुपयांच्या १६७० व २०० रुपयांच्या २४० अशा एकूण आठ लाख ८३ हजारांच्या बनावट भारतीय चलनी नोटा मिळाल्या. त्यामुळे आरोपी मंगेश दादासाहेब वाळे (५१, रा. सिंहगड रोड (पुणे), मोहन वालिया मुडावत (४०, रा. पुणे) याला अटक करून नोटा अपर कोषागार अधिकारी व स्टेट बँक (धाड) येथील अधिकाऱ्यांकडून तपासल्या असता त्या चलनी बनावट असल्याबाबत अभिप्राय दिला. आरोपींच्या ताब्यातून ५०० रुपये मूल्याच्या बनावट भारतीय चलनी
Discussion about this post