विहिरगांव प्रतिनिधी:-रजत चांदेकर

पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांचे संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पोलीस व जनता यांचे संबंध सलोख्याचे करण्याकरिता गावांपासून ते जिल्हा पातळीवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी पोलीस स्टेशन वडकी येथे दिनांक 09/01/2024 रोजी कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या सामन्यांमध्ये एकूण 14 संघांनी सहभाग नोंदविला आहे. सर्व सामने उत्साहात व शांततेत पार पडले आहेत. सदर सामन्यामध्ये प्रथम क्रमांक – करंजी सोनामाता, द्वितीय क्रमांक सावित्री पिंप्री, तृतीय क्रमांक झुल्लर यांनी पटकाविल्याने त्यांना पोलीस स्टेशन कडून ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला असून पुढील स्पर्धेकरिता करंजी सोनामाता येथील टीम ची निवड करण्यात आलेली आहे. सदर सामने यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री सरोदे सर खैरी आणि राकेश सर सैनिक पब्लिक स्कूल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली शिवाय वडकी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी चांगली मेहनत घेतली आहे..
Discussion about this post