

तालुका प्रतिनिधी : चंद्रकांत भोरे..
दि. हदगांव (नांदेड)
हदगांव तहसील कार्यालया च्या प्रांगणा मध्ये पाणी टंचाई आढावा बैठकीचे आयोजन गटविकास अधिकारी, बळवंत प.स.हदगांव यांनी आयोजित केली होती.यावेळी आमदार बाबुरावजी कदम, कोहळीकर माजी खासदार सुभाषराव वानखेडे, तहसीलदार हदगांव, जिल्हाप्रमुख विवेकजी देशमुख, भागवत देवसरकर, गटशिक्षणाधिकारी फोले सर व प्रत्येक गावचे ग्रामविकास अधिकारी,सरपंच, पत्रकार उपस्थित होते.
यावेळी लोकनेते आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी प्रत्येक गावचे पाणी प्रश्नावर गंभीर दखल घेतली.व अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले.व प्रत्येकांना न्याय देण्यासाठी तत्पर राहील.असे ठणकावून सांगितले. यापुढे जर कोणी दुर्लक्ष केले तर संबंधिताचा निलंबनाचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या..
Discussion about this post