तुमसर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा लांडगे (जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष), सरियु दहाट (समाजसेविका), स्मिता उरकुडे (तुमसर पोलीस स्टेशन महिला समुपदेशक), आणि शालिनीताई बागडे (समाजसेविका) उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महिला मंडळाच्या सचिव सुरेखा चंद्रिकापुरे यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले.
कार्यक्रमात जिजाऊ नर्सिंग कॉलेजच्या संचालिका वैशाली भवसागर व विद्यार्थिनींनी नृत्य आणि नाटिकेच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव केला. तसेच छोट्या चिमुकल्यांनी व नगर परिषद गांधी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनीही नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मंच संचालन वर्षा देशभ्रतार यांनी केले, तर कार्यक्रमाची प्रस्तावना मनीषा गजभिये यांनी मांडली. आभार प्रदर्शन सरिता माटे यांनी व्यक्त केले.
महिलांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन
प्रमुख पाहुण्यांपैकी प्रतिभा लांडगे यांनी महिलांना एकत्र येऊन कार्य करण्याचे व स्वबळावर लढण्याचे महत्व पटवून दिले. त्यांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेवर भर दिला. स्मिता उरकुडे यांनी मुलींना चुकीच्या मार्गावर न जाण्याचा सल्ला देत योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांचा एकत्रित सहभाग आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला एक विशेष रंगत आली.
Discussion about this post