बाबूराव बोरोळे
जिल्हा प्रतिनिधी लातूर
डिगोळ:शिरुर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळ येथे ग्रामस्थाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सार्वत्रिक सार्वजनिक लक्षमण शक्तीचा कार्यक्रम आज रविवारी दि.१२/0१/२०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम पहाटे पाच वाजता सुरु होवून सायंकाळी महाआरतीने सहा वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील व डिगोळ परिसरातील भाविक भक्तांनी या लक्ष्मण शक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मण शक्ती कमेटी व ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे.व याच दिवशी रात्री नऊ वाजता श्री ह.भ.प. गुरुवर्य विठ्ठल दादा महाराज वासकर पंढरपूरकर यांचे किर्तन होणार आहे.
Discussion about this post