खांडबारा (प्रतिनिधी)
नवापूर तालुक्यातील खैरवे येथील जिल्हा परिषद शाळा येथे खांडबारा बीट स्तरीय नवभारत साक्षरता उल्हास मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आर बी चौरे गटशिक्षण अधिकारी प सं नवापूर
याप्रसंगी
माहिती व तंत्रज्ञान, वाहतुकीचे नियम ,मूलभूत साक्षरता, व संख्याज्ञान आर्थिक साक्षरता, पथनाट्य ,पारंपारिक खेळ, गाणी, लावणी, नृत्य, स्वागत गीत, तसेच मान्यवरच्या सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी
प्रमुख मान्यवर धरमसिंग वसावे जिल्हा परिषद सदस्य ,चांदुलाबाई वसावे प.स सदस्य लीलाबाई कोकणी प.स सदस्य, इंद्रसिंग गावित सरपंच खैरवे, सोनियाताई गावित एस एम सी, अध्यक्ष मोठे खैरवे दिनेश पाडवी एस एम सी अध्यक्ष लहान खैरवे, प्रमिलाताई गावित उपसरपंच खैरवे रीनाताई गावित, किशोर रायते विस्तार अधिकारी नवापूर, आर बी वाघ ,सुनील भामरे, लीलाताई पाटील ग्रामसेवक खैरवे, शिक्षण विस्तार अधिकारी प.स नवापूर शीलवंत वाकोडे यांनी प्रस्तावित केले.
कार्यक्रमाचे निरीक्षक म्हणून मेंहद्र नाईक केंद्रप्रमुख श्रावणी, वसंत सूर्यवंशी मुख्याध्यापक जि प शाळा उचीमोली ,जीवन वळवी मुख्याध्यापक पाटीलफळी गलाडी, परमेश्वर मोरे अध्यक्ष क्रॉसस्टाइल संघटना, राजू सिंग पवार केंद्रप्रमुख प्रभारी मुख्याध्यापक , संजय वळवी सरचिटणीस मध्यवर्ती संघटना, मीना वळवी मुख्याध्यापक ॲग्री हायस्कूल खांडबारा, सावित्री वळवी मुख्याध्यापक माध्यमिक शाळा खैरवे, छाया पाडवी मुख्याध्यापक जी.प शाळा मोठे खैरवे, प्रभू वळवी मुख्याध्यापक जीप शाळा लहान खैरवे, काकुस्ते सर मुख्याध्यापक जी प शाळा अंबाफळी ,सुनील सोनवणे सर मुख्याध्यापक जी प शाळा शेगवे, शिंदे सर मुख्याध्यापक माध्यमिक शाळा खैरवे
म्हणून काम पाहिले तर
सूत्रसंचालन जीवन विकास माध्यमिक शाळेतील किरण दाभाडे सर यांनी केले.
आभार केंद्रप्रमुख प्रमुख पंडित एडाईत यांनी मानले





Discussion about this post