
उदगीर/कमलाकर मुळे :
शिक्षणामुळे आधुनिक काळात स्त्रियांची परिस्थिती सुधारत आहे. आज स्त्रिया हिमालयापासून ते अंतराळापर्यंत सगळीकडे आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन मंगळापर्यंत झेप घेत आहेत. स्त्री ही कितीही सुशिक्षित आणि मिळवती असली तरी तिच्या अंतकरणाची मूळ प्रेरणा घरच आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढतात, झगडतात आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. भारतीय संस्कृतीच्या कुटुंब या विद्यापीठाचा पहिला कुलगुरू स्त्री होय. महिला आपल्या स्त्री सुलभ वात्सल्याने आपल्या कुटुंबाचे पोषण आणि संवर्धन करतात. स्त्रीचे दयाळू हृदय हीच स्त्रीची खरी संपत्ती. स्त्री ही पैशावर नव्हे तर प्रेमावर, वासल्यावर जगते. आपल्या अंतरंगात सुगंधित कस्तुरी आहे. हे कस्तुरीमृगाला कोठे ठाऊक असते. त्याचप्रमाणे स्त्रीला आपल्या वास्तल्याबद्दल ही माहिती नसावेत असे प्रतिपादन महाराष्ट्र शासननियुक्त शासकीय सदस्य तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त सदस्य एवमं ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रेरणेने स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केले.
ते जागतिक महिला दिनानिमित्त दि.८ मार्च शनिवारपासून ते दि.१५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनांपर्यंत महिला जागर जनजागृती मोहीमेच्या वतीने जिजामाता महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.संध्या शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.रूक्मिणी सोमवंशी, जनक्रांती डोंगरी विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्था अतनूर च्या वतीने अध्यक्ष बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, हिप्पळनारी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती इंद्ररबाई रामचंद्र शिंदे, साधुराम ग्रामीण विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजकुमार कापडे, जयहिंद क्रिंडा व व्यायाम शाळेच्या वतीने आर.एल.अतनूरकर बाबर, मानवी हक्क स्वंरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत शिंदे, कै.रामचंद्र शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सचिव सौ.श्वेता शिंदे, ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी उर्फ नाना प्रणित ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राध्यापिका बिराजदार वर्षा गंगाधर, व्यंकटेश शिंदे, मयुरी शिंदे यांच्या वतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून ‘ त्या ‘ स्वावलंबी बनलेल्या जळकोट तालुक्यातील अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती, सुल्लाळी, डोंगरगाव, देवूळवाडी, मांजरी, कोदळी, आवलकोंडा, उदगीर तालुक्यातील पिंपरी, शिरोळ जानापूर, नागलगाव, सुमठाणा, शेकापूर, मलकापूर, तोंडचीर, निडेबन सह शहरातील भगीरथ राजा नगर, जळकोट रोड, अष्टविनायक कॉलनी, देगलूर रोड, नांदेड-बिदर रोड, आझाद नगर, अलअमिन नगर, तळवेस गल्ली, पारकट्टी गल्ली, चौबारा, किल्ला गल्ली, समता नगर वस्तीमध्ये उपेक्षित नारीशक्तीचा सन्मान व महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बालासाहेब शिंदे यांनी असे प्रतिपादन केले. यावेळी संगीता पाटणे, अरुणा देशपांडे आणि गीता ताई उपस्थित होत्या. महिला जागर मोहिमेअंतर्गत उपेक्षित नारी शक्तीचा सन्मान करताना यावेळी प्रत्येक महिलेने स्वतःची ओळख मांडली. त्यांनी त्यांचे अनुभव ही मांडले ज्याने आमचे एकमेकांसोबत एक नाते तयार झाले. बहुतांशी महिला घरकाम करणाऱ्या होत्या. कार्यक्रम खूप चांगला झाला. कार्यक्रमाचे आयोजक व प्रास्ताविक दीनदलितांचे मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सोमवंशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुनिता भंडारे यांनी मानले..
Discussion about this post