दौंड तालुका -दौंड चे आमदार राहुल कुल यांची आदर्श गाव हिवरे बाजार गावाला भेट.
दुष्काळाच्या खाईतून गावाला बाहेर काढून आदर्श गाव बनवणारे आदर्श सरपंच पद्मश्री श्री. पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार या गावाला आज त्यांनी भेट दिली.
श्री. पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार या ठिकाणी सिंचनाचे आणि वनराईचे जी कामे केली आहेत त्याची महती देशातच नाही तर विदेशातही झालेली आहे. या कामाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
यावेळी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. नामदार श्री. जयकुमार भाऊ गोरे व पारनेरचे आमदार श्री. काशिनाथ दाते सर हे उपस्थित होते.
Discussion about this post