विहिरगाव प्रतिनिधी:-रजत चांदेकर

(ता. १२/१/२०२५ )राळेगाव प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न सोहळा राज्याचे माजी क्रीडा मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रवींद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, यवतमाळ अर्बन बँकेचे संचालक ऍड. प्रफुल्लसिहं चौहान, माजी नगराध्यक्ष बबनराव भोंगारे, राकाँ तालुका अध्यक्ष शशिकांत धुमाळ, शिवसेना शहर प्रमुख संतोष कोकुलवार, राकाँ. शहर अध्यक्ष प्रकाश खुडसंगे, आदर्श मंडळाचे उपाध्यक्ष अशोक भागवत, सदस्य प्रदीप ठुणे, युसूफली सैय्यद, उपस्थित होते.सामाजिक एकतेचं दर्शन खेळाच्या मैदानवरच पहावयास मिळत असल्याचे मत आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आजच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचे वैशिष्ट आदर्श चॅम्पियन वर्सेस मार्कडेय पब्लिक स्कुल लहान मुलांचा दर्शनीय सामना रोमचक स्थितीत पोहचून सामना बरोबरीत सुटला. या सामन्याचा सामनावीर ठरला.उत्कृष्ट आयोजनाबद्दल आदर्श मंडळाच्या सर्व सदस्यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
Discussion about this post