११वे कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सव २०२५. प्रथम प्रयोग ‘देहभान ‘ ने सुरुवात..
आजरा: प्रतिनिधी.
आजरा येथे राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून आजऱ्याचे जेष्ठ रंगकर्मी कै. रमेश टोपले यांच्या स्मृती जपण्यासाठी आजरा येथे गेली १० वर्षे नाट्य महोत्सव परंपरा जपण्यासाठी आजही कायम आहे.
या वर्षी ११ व्या नाट्य महोत्सवासाठी ज्येष्ठ रंगकर्मी बाळासाहेब आपटे ( चाफवडे ) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी नवनाट्य कलामंच संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी होते.
सुरुवातील उदय गोडबोले यांचे ‘ देहभान ‘ सांगली येथील नाट्य विद्या मंदिर संस्थेच्या वतीने सुरुवात करणेत आली.
नाट्य महोत्सवाचे अध्यक्ष आय. के. पाटील यांनी नवनाट्य कलामंच वाटचालीचा आढावा घेतला. १९५८ पासून हा मंच नाट्यक्षेत्रात कार्यरत असून त्याचा वारसा पुढे जपण्याचे कार्य आज ही चालू आहे. नाट्य परंपरा कायम जिवंत रहावी यासाठी आजच्या तरुण पीढीने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
उदय गोडबोले नाटय दिग्दर्शक यांचे ‘ देहभान ‘ यांनी आजऱ्याचे नाव हे नाट्यक्षेत्रात आजही प्रथम स्थानी आहे. आजरा आणि सांगली चे नाते अधिक जवळचे आहे. याचे कारण म्हणजे कै. रमेश टोपले यांच्यामुळे आजही आठवणी उजळा देत आहेत.
अध्यक्षीय भाषणात अशोक चराटी म्हणाले, कै. रमेश टोपले यांनी नाटयक्षेत्राला आजरा या गावाची नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आपण या कला महोत्सव माध्यमातून परंपरा जपली पाहीजे असे आपले मत व्यक्त केले.
पुढील आठ दिवस चालणाऱ्या नाट्य सादरीकरणाचा रसिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन अध्यक्षानी केले.
या कार्यक्रमाचेवेळी सुतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, ज्योस्ना चराटी, अनिकेत चराटी, मामदेव सर, बाळासाहेब आपटे, योगेश पाटील, आय. के. पाटील सर आणि नवनाट्य कलामंचे चे सर्व पदाधिकारी आणि नाट्य रसिक उपस्थित होते.
आजचा नाट्य प्रयोग ‘ तिचे संदर्भ नसलेली गोष्ट ‘
लेखक – राजन खान
नाट्य रुपांतर – डॉ. प्रमोद खाडीलकर
दिग्दर्शक – पायल पांडे
Discussion about this post