कै. श्री. भिमराव तुकाराम चव्हाण साहेब यांचा ५ वा पुण्यस्मरण कार्यक्रम व क्रिडा स्पर्धा बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न…
आजरा: प्रतिनिधी,
महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ हातिवडे चे संस्थापक अध्यक्ष कै. भिमराव चव्हाण साहेब यांचा पाचवा पुण्यस्मरण कार्यक्रम रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सरस्वती हायस्कूल, हातिवडे येथे माजी विद्यार्थी सभागृहामध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक महात्मा शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळ हत्तिवडे मारुती नानू चौगले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. विष्णुपंत केसरकर, संचालक वसंतराव देसाई सहकारी साखर कारखाना, गवसे यांच्या हस्ते क्रिडा स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्याना बक्षिस देणेत आले.
कै.भिमराव चव्हाण साहेबांचा राजकिय प्रवास
गावामध्ये सर्व सोई सुविधा गावाचा विकास करणे हेच ध्येय ठेवले
१९६२- सेवा संस्थेचे सेक्रेटरी म्हणून काम पाहिले.
१९६५ – हातिवडे गावचे सरपंच म्हणून विक्रमी २५वर्षे काम पाहिले.
हिरण्यकेशी पाणी पुरवठा संस्थेची स्थापना करून ४६वर्ष अध्यक्ष पद भुषविले.
१९७८ आर्थिक पुरवठा देवाण घेवाण शेतकरी लोकांच्या गरजा लक्षात घेवून महात्माफुले सहकारी पत संस्थेची स्थापना केली.
१९८३- शिक्षणाची गरज लक्षात घेवून गोरगरिब शेतकरी यांच्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर गावी जाणार तिथे त्यांची शिक्षण व रहाणेची सोई सुविधा लक्षात घेवून सरस्वती हायस्कूल ची स्थापना केली.
कॉंग्रेस आय. आजरा तालुका १७ वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
व्यंकटराव हायस्कूल,आजरा२०वर्षे संचालक म्हणून काम पाहिले.
आजरा साखर कारखान्यात सुरुवाती पासून म्हणजे स्थापने पासून व्हा.चेअरमन म्हणून कामकाज पाहिले होते.
१९९० मध्ये गावामध्ये आरोग्य सुविधा मिळणे साठी प्रयत्न करून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली.
असा हा राजकिय प्रवास चव्हाण साहेब यांचा होता. त्यांना विनम्र अभिवादन !
Discussion about this post