मायणी :प्रतिनिधी बाळासाहेब कांबळे
जिल्हा परिषद सातारा अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील २०२४-२५ च्या जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारवडी शाळेने जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळवून यश प्राप्त केले.
दीड गुंठा जागेमध्ये असलेल्या या परसरबागेसाठी शाळेने ग्रामस्थ व पालकांच्या सहकार्याने तीन ट्रॉली काळी माती उपलब्ध केली. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने व ठिबक सिंचनाच्या आधारे वेल वर्गीय,कंद, फळभाज्या, पालेभाज्या, त्याचबरोबर औषधी वनस्पतीची लागवड करून परसबाग फुलवण्यात आली. शिवाय त्यांनी गांडूळ खत निर्मिती केलेली आहे. यामधून पिकलेल्या कांदा, वांगी,टोमॅटो, बीट यांचा ते विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये वापर करतात. त्यामुळे शालेय पोषण आहाराचे पोषण मूल्य वाढले आहे. शाळेच्या वतीने माझा वाढदिवस माझी झाड भेट हा उपक्रम राबविण्यात येतो. यामुळे ही परसबाग अधिक फुललेले आहे.या परसबाग निर्मितीसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादासाहेब पवार, उपाध्यक्ष जयश्री कदम मुख्याध्यापक अरुण आवळे, सहकारी शिक्षक दिपाली जाधव,सुनील जगदाळे,अनिता जगताप व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
गटशिक्षणाधिकारी सौ. सोनाली विभुते,
विस्तार अधिकारी( बुध) संगिता गायकवाड,केंद्र प्रमुख नितीन खोत,
सरपंच,उपसरपंच,शिक्षणप्रेमी,शिवा जी शेडगे ,संजय शेडगे, भरत शेडगे, प्रताप मदने, धनाजी मदने, प्रशांत जाधव यांनी अभिनंदन केले.
Discussion about this post