• गडचिरोली : जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एमकेसीएल, पूणे तर्फे दहावी बोर्ड परीक्षेची तयारी हा दहा तासाचा स्मार्ट टिप्स कोर्स मोफत सुरू करण्यात आला आहे.
• या कोर्ससाठी इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल यासारख्या विषयांसाठी मॉडेल उत्तर पत्रिका, उतर लेखन कौशल्य, वेळेचे नियोजन आणि सरावासाठी मार्गदर्शन दिले जाते.स्मार्ट टिप्स कोर्स विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी धोरणात्मक अंतरदृष्टी व प्रभावी टिप्स प्रदान करतो.
•यासाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप उत्तर लेखनातील सामान्य चुका आणि अभ्यासाच्या आधुनिक पद्धतीवर भर दिला आहे. विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या एमएस- सीआयटी केंद्रांशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील ४९ केंद्रावरती ही सुविधा मोफत उपलब्ध आहे. अशी माहिती एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक प्रशांत मंगळगिरी यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: श्री कॉम्पुटर पॉइंट गांधी वार्ड कुरखेडा•संचालक: नीलू दिलीपकुमार आहुजा 7083845699
प्रतिनिधी:- प्रविण डी कोवाची (9637165828)
Discussion about this post