. शहरात संविधान शिल्प विटंबना घटनेच्या संदर्भात झालेल्या आंदोलन या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वतीने आंदोलकांवर झालेला अमानुषपणे लाठी चार्ज तसेच पोलीस कॉम्बिग ऑपरेशन करून वसाहती मधून महिला तरुण यांना मारहाण करत केलेली अटक सत्र तसेच आंदोलनात,
आंदोलक असणारा सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीमध्ये झालेल्या मृत्यू आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते विजय वाकोडे यांच्या ताणतणावात झालेल्या हृदयविकाराने मृत्यू तसेच शेकडो आंदोलकांवर जाणीवपूर्वक पोलिसांच्या वतीने दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी
आणि वाकोडे व सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळावा व संबंधित दोषी असणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई व्हावी,संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या सोपान पवार या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,
या अनुषंगाने आज दिनांक 15 जानेवारी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची भेट घेऊन यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना या मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
यासह अन्यही मागण्या निवेदनात देण्यात आल्या आहेत.
Discussion about this post