भोकरदन : कै. दशरथ बाबा माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. अमोल कड सर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी दिशा निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक उपक्रम, आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे.
श्री. कड सर हे फक्त प्राचार्य नसून शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी कारकीर्द घडवली आहे. विद्यालयाला मिळवून दिलेल्या यशामुळे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त, विद्यार्थ्यांसह समस्त शिक्षक आणि पालकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरभराट, उत्तम आरोग्य, आणि यशाचा मार्ग सतत प्रकाशित राहो, अशी शुभेच्छा सर्वांनी व्यक्त केली.
शुभेच्छुक:
ऋषिकेश कांबळे, विद्यार्थी 16जानेवारी २०२५
Discussion about this post