सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेली आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी खंडणे सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ व वयोवृद्ध संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन इत्यादी विषयासह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलने उपोषणे निवेदने त्याच बरोबर राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर समन्वयक पदी युवा पत्रकार लक्ष्मण सुरवसे यांची नुकतीच निवड करण्यात आली होती त्यांच्या निवडीचे स्वागत करून पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक तथा दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिरझागालिब मुजावर यांच्या हस्ते मंगळववेढा येथे शाल पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू सरचिटणीस अरुण सिडगिद्दी अंबादास गज्जम उपस्थित होते.
Discussion about this post