•कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम सर यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी बिरसा मुंडा यांच्या आदर्श, संघर्ष आणि योगदानाचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी समाजातील वंचित आणि शोषित घटकांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले.
•कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून एकल सेंटर गडचिरोली येथील अधिकारी वर्ग तसेच तालुक्यातील समस्त सहयोगी मित्र हे होते.
•कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून लाभलेले एकल सेंटर गडचिरोली येथील नोडल अधिकारी तथा कृषी तज्ञ श्री मंगेशजी भानारकर सर यांनी या वेळी सांगितले की एकल सेंटर हि एक संस्था नसून हे एक जिल्हा प्रशासन गडचिरोली यांच्या मार्फत चालविण्यात येणारी ही एक यंत्रणा आहे व ही यंत्रणा जिल्हाधिकारी मार्फत चालविण्यात येते व एकल सेंटर कश्या प्रकारे काम करते ते सुध्दा सांगण्यात आले तसेच नागरिकांना जोडपत्र-तीन बद्दल सुध्दा या मार्गदर्शनात सांगण्यात आले.

•तसेच कार्यक्रमाचे पेसा मार्गदर्शक म्हणून एकल सेंटर गडचिरोली येथील समन्वयक श्री चंद्रकांत किंचक सर यांनी नागरिकांना पेसा काय आहे आणि पेसा ची निर्मिती केव्हा झाली, कशासाठी झाली आणि पेसा म्हणजे काय, त्याचं पूर्ण नाव काय आहे पेसा चे महत्व काय आहे आणि पेसा फक्त आदिवासी साठी नाही तर संपुर्ण गावांसाठी आहे व गावाच्या विकासासाठी आहे असे खूप सारे महत्त्व या ठिकाणी कींचक सरांनी या वेळी नागरिकांना सांगीतले.

•तसेच कार्यक्रमाचे वन हक्क मार्गदर्शक म्हणून एकल सेंटर गडचिरोली येथील श्री. निलेश देसाई सर यांनी वन हक्क बद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले त्यांनी म्हटले की जंगल जर खरोखर वाचविण्यासाठी समोर होणार तर ते फक्त आदिवासीं कारण आदिवासीं आहेत तर जंगल आहे नाही तर जंगल नाही आणि पुन्हा त्यांनी म्हटले की जंगलाचे स्वरक्षण करणे खूप महत्वाचे आहेत कारण आपण जंगलापासून आपल्याला उपजिविकेसाठी सुध्दा खूप मोठया प्रमाणात मदत होते व गौण वन पासून पैसे सुध्दा आपल्याला कमवता येथे म्हणून जंगलाचे स्वरक्षण व संवर्धन करणे खूप महत्वाचे आहे आणि या मध्ये ग्रामसभा ची सुध्दा खूप मोलाची भूमिका असायला पाहिजे.

•तसेच कार्यक्रमाचे गोंडी मार्गदर्शक म्हणून एकल सेंटर गडचिरोली येथील मार्गदर्शक श्री.चरणदासजी जाळे सर यांनी गोंडी मध्ये मार्गदर्शक करतांना खूप मोलाची भूमिका बजावली.

•तसेच कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गाणी, नृत्य आयोजित करण्यात आल्या होत्या. स्थानिक कलावंतांनी आपल्या कलाकृतींमधून बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करून दिले.
•या कार्यक्रमाला उपस्थित माजी जिल्हा.प.उपाध्यक्ष.जिवन पाटील नाट,माजी सभापती परसराम टिकले,माजी जि.प. स.इंदुरकर सर, हंसराज काल्हे, संध्याताई नैताम,आशाताई कुंमरे,लताताई डोंगरगाव,पुराम मॅडम,उपसंपरच खैरी दिलीप गायकवाड,संरपच दिनकर कुंभरे,तंटामुक्ती अ.उसेंडी साहेब,भजन कोल्हे,अशोक गायकवाड,अनिल केरामी,रमेश कोरचा सर,नैताम साहेब,काटेंगे महाराज,सुनिताताई उसेंडी,शोभाताई तुलावी, बाळूजी पंधरे तसेच एकल सेंटर गडचिरोली येथिल तालुक्यातील सहयोगी मित्र:- सरीताताई किरंगे, अंकिताताई नैताम,सिमाताई सय्याम, शिशुकलाताई लंजे, जगदीश मानकर, प्रविण डी कोवाची व स्थानिक नागरिक, तरुण वर्ग, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
•जनजागृती आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे सामाजिक एकजूट आणि क्रांतिकारी विचारांचा प्रसार करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खैरी/बेलगाव येथील नागरिक आणि आयोजकांचे विशेष योगदान राहिले.

प्रतिनिधी:- प्रविण डी कोवाची (9637165828)
Discussion about this post