विहिरगांव प्रतिनिधी:-रजत चांदेकर

ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय किडूज वाढोना बाजार येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यानी सहभागी होऊन आपले नृत्याविष्कार सादर केले. ईतकेच नाही तर विद्यार्थ्यांसोबत पालकांच्या सुधा सहभागी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमातून परिसरात कौतुक होत आहे. कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे सचिव डॉ. संतोष कोकूलवार, संचालिका तथा प्राचार्या डॉ. शीतल बलेवार, श्री. प्रकाश पोपट, श्री. आकाश पोपट, उपसरपंच श्री. योगेश देवतळे आदी उपस्थित होते तसेच परिसरातील सर्व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व शाळेच्या शिक्षकांनी सहकार्य केले.
Discussion about this post