एक कट्टर काँग्रेस कार्यकर्ता
काँग्रेसच्या नेतेमंडळींनी तुम्हीच सांगा आम्ही कार्यकर्त्यांनी करायचे तरी काय?
विधानसभेच्या रणधुमाळीत चालू असलेल्या उमरखेड विधानसभेतील काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत नेतेमंडळी एकमेकांच्या आप आपसामध्ये दुफळी निर्माण करून उमरखेड महागाव विधानसभेतील सर्व कार्यकर्त्यांची आपापसात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न आज उमरखेड विधानसभेच्या स्वयंभू नेत्यांनी सुरुवात केली आहे साहेब यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा दोष काय?
तुम्ही नेते मंडळी मोठी माणसं तुमच यात काही नुकसान होणार नाही परंतु आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं काय कुठल्याही निवडणुका आल्यावर प्रथम तुम्ही नेते असल्यामुळे तुमचा विचार केला जातो आणि तुम्ही देशाल ते आदेश आज पर्यंत आम्ही पाळत आलेलो आहे आज विधानसभेमध्ये चालू असलेल्या गटबाजीचा फायदा घेत विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण आहे की या गटबजी चा फायदा पूर्णपणे आपल्याला होईल असा त्यांचा समाज आहे
आणि तो समज तुम्ही आपसी गटबाजीमुळं पूर्ण करशाल असा आम्हाला पण विश्वासच वाटू लागला आहे
तुमच्या या आपसी गटबाजीमुळे काही तुमचे निकटवर्गीय मला भाऊचा आदेश आला कोणी बोलेल की मला साहेबांचा आदेश आला कोण कुणाचं काम करेल याची शाश्वती आज राहिलेली नाही परंतु साहेब एक लक्षात घ्या निवडणुका तुमच्या नेत्याच्या झाल्यानंतर आम्हा कार्यकर्त्याच्या सुद्धा निवडणुका काही दिवसात होणारच आहेत त्यामध्ये नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या निवडणुका आमच्या कार्यकर्त्याच्या आहेत उद्या जर एका गटा कडून तिकीट मिळालं तर दुसरा गट आपल्याच पक्षातल्या आपल्याच माणसाची माती करायला मागेपुढे बघणार नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही करायचं तरी काय तुमच्या अशा वागण्याने कधी कधी आमच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की कदाचित पक्ष बदलला तर बरं राहील का तुमच्या आदेशानुसार आम्ही रात्रंदिवस आमच्या भागातील लोकांची काम करण्यात त्यांच्या अडचणी सोडविण्यात व्यस्त असतो आणि एवढी मेहनत तुमच्या आपसी गट बजाबाजीमुळं आमची वायाला जाईल असं तरी आम्हाला शंभर टक्के वाटायला लागलं, नेते साहेब तुम्ही थोडासा विचार करा आपण काय करतोय आपण कुठे चुकतोय आम्ही तुम्हाला सांगण्या एवढे आणि तुम्हाला शिकवण्या एवढे मोठे नाहीत आम्ही एक सामान्य कार्यकर्ते आहोत तुम्ही नेते मंडळी तुम्हाला जर या गटबाजीचा विरोधकाला फायदाच करून द्यायचा असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याची आणि मतदारांची गरज काय तुम्हाला वाट्टेल तसं तुम्ही वागायला लागलात भानगडी आणि नुकसान करा आमचं तुम्ही काय हो प्रत्येक निवडणुका आल्यानंतर तुमच्या घरी प्रत्येक पक्षाचा माणूस येऊन जातो. आणि तुम्ही घरी बसून आदेश देता आम्हा कार्यकर्त्यांना आपला पक्ष काँग्रेस आणि आदेश देता दुसऱ्याच पक्षाचे काम करण्याचे तुमच्या या अशा वागण्यामुळे कधी कधी आम्हालाच प्रश्न पडतो
आम्ही कुठल्या पक्षाचे आहोत ते मग तुम्हीच सांगा आम्ही करायचं तरी काय? काय करायचं आपसात भानगडी करायच्या की मारामाऱ्या करून घ्यायच्या आज विधानसभेमध्ये अशी परिस्थिती प्रत्येक गावामध्ये आहे की दोन गटाचे आपसातले कार्यकर्ते दोन्ही काँग्रेस गटाचेच कार्यकर्ते असलेले आज आपसामध्ये एकमेकाकडे एका क्रूर नजरेने बघत आहेत याला जबाबदार कोण नेते मंडळी का आम्ही चुकत असेल तर आम्हाला माफ करा परंतु आज परिस्थिती आपल्या काँग्रेस पक्षाची अशी झालेली आहे की तुम्ही उद्या जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिकेला कुठल्याही व्यक्तीला तिकीट घे आणि उभा राहा असा जरी बोललात तरी त्याच्या मनात एका प्रकारची भीती निर्माण राहील की आपण याचा माणूस उद्या आपल्याच पक्षातील दुसऱ्या गटातला माणूस आपला विरोध करेल आणि आपल्याला पराभूत करेल कुणाला इथे शाश्वती नाही आजच्या परिस्थिती नुसार आणि कोणी हिम्मत पण करणार नाही उमेवारी घेण्याची, काही नेतेमंडळींनी जीन प्रेस एक प्रतिष्ठेचा विषय करून ठेवला होता त्या नेत्याच्या डोक्यामध्ये उमरखेड विधानसभेची संपूर्ण काँग्रेस आपल्या ताब्यात घेण्याच एक षडयंत्र तयार केलं होतं दोन माजी आमदारांना डावळून आपण कसा मोठा होईल या प्रयत्नामध्ये तुम्ही सगळी काँग्रेस संपवायला निघालात कितीतरी लोक जीन प्रेस च्या नंतर काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले कोणी शिवसेनेमध्ये कोणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून आपल्या पक्षातून दिग्गज लोक निघून जात आहेत याचा थोडा तरी आदर्श घ्या एक लक्षात ठेवा विधानसभेच्या माध्यमातून तुम्ही जी आज गटबाजी निर्माण केली याचे परिणाम तुम्हा नेतेमंडळींना भोगावे लागतील
नेतेमंडळींनो लक्षात ठेवा विधानसभा पार पडली म्हणजे सर्व निवडणुका बंद झाल्या किंवा संपल्या अशातला भाग नाही यानंतर बऱ्याचशा निवडणुका आहेत आणि येणारच आहेत त्यावेळेस बघा काय होईल ते याचे परिणाम आम्हा कार्यकर्त्यांनाच नाही तर तुम्हाला नेत्याला सुद्धा एक दिवस रडवतील तेव्हा तुमच्या हातातून सर्व वेळ निघून गेलेली असेल कुठे नेऊन ठेवली तुम्ही नेते मंडळींनी काँग्रेस काय करायचं आम्ही कार्यकर्त्यांनी आपसात भानगडी करून घ्यायच्या की तुमच्या गटबाजीमुळं आम्ही आमच्या गावामध्ये वातावरण तापून घ्यायचं कोणी म्हणते मी या गटाचा कोणी म्हणते मी त्या गटाचा आज विधानसभेमध्ये कोणीही बोलायला तयार नाही की मी काँग्रेसचा पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून हे कुणामुळे चालू आहे तुम्हा नेत्यामुळे चालू आहे आम्ही किती दिवस सहन करायचं किती दिवस तुमच ऐकून घ्यायचं
नेतेमंडळींना आमची कार्यकर्त्यांची विनंती आहे विधानसभेला तिकीट कोणालाही मिळो पण तुम्ही एकजुटीने काम केलं तरच या उमरखेड विधानसभेमध्ये काँग्रेसचा झेंडा लागेल अन्यथा तुम्ही भविष्यात नेत्याच सोडून द्या पण कार्यकर्त्याला सुद्धा कुठे संधी मिळणार नाही हे लक्षात ठेवा
आज आम्ही कार्यकर्ते ग्रामपंचायत पासून पंचायत समिती जिल्हा परिषद पर्यंत कसे पोहोचेल यासाठी जनतेची काम अहोरात्र करत आहोत यामध्ये आमचा दोष काय की आम्ही फक्त तुमच्याच चाकऱ्या करायच्या आणि असंच जर असेल तर आम्ही तुमचं का म्हणून ऐकायचं किती दिवस ऐकायचं तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी या उमेदवाराच्या पाठीमागे राहा त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहा असं बोलण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी तुम्ही नेतेमंडळी या विधानसभेसाठी जो कोणी इच्छुक उमेदवार असेल त्यांना त्यांचं काम करू द्या पण
तुम्ही नेते मंडळी तरी काँग्रेस एकसंघ ठेवायला हवी होती अशी आशा होती परंतु तुम्हीच नेते मंडळींनी या काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण केली असा उमरखेड विधानसभेतील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप आहे तालुक्यातल्या नेतेमंडळींनी असं ठरवायला पाहिजे की ज्या व्यक्तीला तिकीट मिळेल काँग्रेस पक्षाचे त्या व्यक्तीच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि त्या उमेदवाराला या विधानसभेचा आमदार करू अशी शाश्वती आम्हा कार्यकर्त्यांना तुम्ही का देत नाही
तुम्ही नेते मंडळींनी ही गटबाजी अशीच कायम जर ठेवली तर लक्षात ठेवा तुमच्या मागे कोणी कार्यकर्ता राहणार नाही सर्व पक्ष सोडून निघून जातील एक दिवस त्यावेळेस तुमच्याजवळ पश्चातापाशीवाय काहीही शिल्लक राहणार नाही
Discussion about this post