
अतुल कोवे / मारेगाव
विद्यानिकेतन स्कूल कायर येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात कायर, येथील विद्यानिकेतन स्कूल मध्ये स्वामी विवेकानंद यांची 161 वी व राष्ट्रमाता जिजाऊ यांची 426 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौं सरला ठावरी होत्या याप्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊची वेशभूषा कुमारी विशाखा गुरनुले, अहिल्याबाई होळकर च्या भूमिकेत मानवी खिरटकर सावित्रीबाई फुले च्या भूमिकेत उत्कर्षा नवले इत्यादी भूमिका विद्यार्थ्यांनी साकारल्या. याप्रसंगी सदर विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ ,सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले.
Discussion about this post