•दिनांक 20 जानेवारी ते 29 जानेवारी पर्यंत कॅम्प बंद राहणार
•गडचिरोली वनवृत्त, सिरोंचा वन विभाग अंतर्गत कमलापुर वनपरिक्षेत्र मध्ये कार्यरत असलेले नऊ हत्तींचे चोपिंग वाढत्या थंडीमुळे हत्तीच्या तळपायाला भेगा पडतात. चालताना त्यांना त्याचा त्रास होतो. त्या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठी त्यांना वैद्यकीय सुट्टी देण्यात आली आहे. अशी सुट्टी त्यांना दरवर्षीच देण्यात येते. या 10 दिवसात त्यांच्या पायांना चोपिंग औषधांचा शेक दिला जातो. ४०-४५ प्रकारच्या जडीबुटींपासून औषध तयार केले जाते. त्यासाठी हिरड, बेहडा, सुंठ, त्रिफळा, जायफळ, आसमंतारा अशा वेगवेगळ्या मवनस्पतींचा वापर करून एका ड्रम मध्ये चोपिंग चा लेप तयार करतात. तो करून सकाळच्या पहाटेला व सायंकाळी हत्तीचे पाय शेकतात.
•महाराष्ट्रातील एकमेव हत्ती बघण्यासाठी कमलापुर हत्ती कॅम्पला अनेक पर्यटक येत असतात. पण सध्या ही 10. दिवसासाठी कॅम्प बंद आहे कारण हत्ती सध्या सुट्टीवर आहेत. दरवर्षी या काळात हत्तींना आराम देऊन त्यांच्या पायांना चॉपिंग केले जाते पी बी झाडे
•वन परीक्षेत्र आधिकारी कमलापुर, 30 जानेवारीपासून कॅम्प नेहमीप्रमाणे सुरवाडीत चालू होणार सध्या थंडीचे लाट सुरू असल्याने हत्तींच्या पायांना भेगा पडू नये म्हणून त्यांना आवश्यक असे चोपींग उपचार केले जात आहे. हत्ती कॅम्प प्रभारी वनरक्षक गुरुदास एच.टेकाम
•दहा दिवस चालणाऱ्या या चोपिंग मध्ये हत्तींचे विशेष काळजी केले जातो त्यादरम्यान त्यांच्या प्रकृतीची तपासणी व रक्त तपासणी केले जाते
•डॉ महेश येमचे पशु वैद्यकीय वन्यजीव अधिकारी कमलापुर
प्रतिनिधी:- प्रविण डी कोवाची (9637165828)
Discussion about this post