:-प्रतिनिधी विरेंद्र चव्हाण
मेटीखेडा (ता. कळंब) येथे लोकशाहीवादी बाळासाहेब सरोदे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त वर्धा येथील प्राचार्य व निसर्गोपचार तज्ज्ञ श्री अनिल फरसुले यांनी “निसर्गोपचार सर्वांसाठी” या विषयावर मार्गदर्शन केले.
प्राचार्य फरसुले यांनी निसर्गोपचारातील पाच मूलभूत घटक – हवा, माती, अग्नी, आकाश आणि पाणी यांचा वापर करून होणाऱ्या उपचार पद्धतींचे फायदे उपस्थितांना समजावून सांगितले. त्यांनी निसर्गोपचाराच्या सोप्या घरगुती उपायांपासून ते व्यावसायिक अभ्यासक्रमांपर्यंतची माहिती दिली.
कार्यक्रमाला साने गुरुजी विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, तसेच गावातील महिला व नागरिकांनी हजेरी लावली. या प्रसंगी डॉ. अंगद राजाभोज, डॉ. अनिल फरसुले, शिल्पा फरसुले, मंगला सरोदे, विजय सरोदे यांनी विचार व्यक्त करत निसर्गोपचाराचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या “खरा तो एकची धर्म” या प्रेरणादायी गीताने झाली. कार्यक्रमाचे संचालन अमित सरोदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गणेश आष्टकार यांनी केले.
उपस्थितांना तिळगुळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त “शंभर उत्तम सवयी” याविषयीची पुस्तिका भेट देण्यात आली. कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये निसर्गोपचाराविषयी नवीन जागरूकता निर्माण केली असून आरोग्य संवर्धनासाठी प्रेरणा दिली.
Discussion about this post