परभणी तालुक्यातील लोहगांव येथे ८जानेवारी ते १७ दरम्यान संत हरिबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरी बाबा मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते लोहगांव येथील प्रती पंढरपूर म्हणून परिचित असलेल्या श्री संत हरीबाबा महाराज मंदिरात श्री क्षेत्र लोहगाव भाविकांच्या भक्तीचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते आषाढी एकादशी व पौर्णिमा व इतर सणाच्या वेळी मोठा उत्सव केला जातो.
यावेळेस भाविक भक्त मोठ्या भक्ती भावाने संत हरीबाबा महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी येत असतात हा सप्ताहाच्या दरम्यान श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान कथा प्रवक्ते प. पु. बालयोगी भागवताचार्य श्री गोपाळ महाराज कारखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती सुरू असलेल्या सप्ताहाच्या दरम्यान भव्य पालखी व शोभायात्रा काढण्यात आली व भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन ही करण्यात आले होते श्री. संत हरीबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाचा शेवट श्रीकांत महाराज लोहगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आला आज सुरू असलेल्या कीर्तनाच्या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन लोहगांव येथे वाहन चालक मालक संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते आज सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी लोहगाव व इतर गावातील भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रधिनिधी राहुल संजय मगरे.
Discussion about this post