प्रतिनिधी: शेख अनिस
नांदेडच्या यशवंत नगर भागातील हनुमान मंदिराजवळ, १८ जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एक ६० वर्षीय व्यापारी अनिल हिराचंद नागडा यांच्यावर तीन अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम लंपास केली.
आरोपींनी संगनमताने फिर्यादीच्या पाठीमागून येत चाकूचा धाक दाखवून हातातील एक तोळ्याची सोन्याची अंगठी (किंमत ७०,००० रुपये) आणि खिशातील ७,००० रुपये रोख रक्कम असा एकूण ७७,००० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, भाग्यनगर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Discussion about this post